मेष - वाहने सावकाश चालवा वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे तसेच वाहतुकीचे नियम पाळा. वाद विवाद नको भांडण टाळा खेळाडूंना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळू शकेल.
वृषभ - सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्यायला सामाजिक - मानसन्मान मिळेल एखादे महत्त्वाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
मिथुन - महत्वाची कामे होतील. विशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेता येतील ओळखी पद्धतीतून विवाह ठरतील व्यवसायिक मरगळ झटकली जाईल वाहने सावकाश चालवा.
कर्क - कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणे आवश्यक आहे खाण्या पिण्याच्या बाबतीत सतर्क राहा. प्रवासात पथ्य सांभाळा.
सिंह - कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधान व सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणाच्या ही गोड बोलण्याला फसवू नका कोणावरी अतिविश्वास घातक ठरू शकतो.
कन्या - आपल्या बोलल्यावर व वागण्या वरती नियंत्रण ठेवा. शालीनता ठेवणे महत्त्वाचे ठरेल. नोकरीत अथवा आपल्या कार्यस्थळी समज-गैरसमज यामुळे भांडणे होण्याची शक्यता आहे.
तूळ - कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाह निश्चित होण्या मधील अडचणी अथवा समस्या दूर होतील ओळखी मध्यस्ती द्वारे विवाह ठरतील.
वृश्चिक - व्यवसाय धंद्यात अथवा नोकरीमध्ये बोलणे चालणे आवरून नाट्यमय प्रसंग घडून कलह सदृश्य घटना घडू शकतात. वादविवाद टाळा गैरसमज टाळा.
धनु - वैवाहिक जीवनात विसंवाद घडू शकतात वेळीच त्याला आवर घालणे गरजेचे ठरेल. जीवनसाथीच्या मताला प्राधान्य द्या. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.
मकर- महत्त्वाचा कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पण संयम दाखवल्यास काम प्रयत्न द्वारे पूर्ण करणे शक्य होईल नोकरीतील नव्या बदलातून लाभ होईल उत्तम दिलासा मिळेल.
कुंभ - शारीरिक दुखापती पासून दूर राहा. वाहने काळजीपूर्वक चालवा वाहतुकीच्या नियमांचे अवश्य पालन करा. व्यवसाय धंद्यामध्ये यंत्रांच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो.
मीन - नोकरीत अनुकूलता लाभेल वरिष्ठांचे संबंध सुधारतील. मात्र कोणावरही शेरेबाजी करू नका. व्यवसाय धंद्यात व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार करू शकाल.