मेष - मनातील योजलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल व्यवसायिक विस्ताराची योजना पूर्ण करू शकाल.
वृषभ - नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील. धनलाभाचे योग. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहाल.
मिथुन - आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील नोकरदारांना दिलासा मिळेल संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांनाहा दिवस उत्तम राहील.
कर्क - घरगुती वातावरण वादविवादाने बिघडणार नाही याची दक्षता घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
सिंह - विविध क्षेत्रात प्रगती होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. गुंतवलेल्या गोष्टीतून चांगला परतावा मिळू शकतो. स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील वाहन खरेदीचे योग.
कन्या - आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल येणाऱ्या प्रसंगांसाठी मन खंबीर ठेवा वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये वर्चस्व राहील.
तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान मिळेल नोकरदारांना दिलासा मिळेल येणाऱ्या प्रसंगांना त्मविश्वासाने सामोरे जा. कमी बोला.
वृश्चिक - व्यवसाय धंद्यात प्रगती करण्याच्या अनेक संधी चालून येतील कुटुंबात मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण आवश्यक राहील.
धनु - हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कौटुंबिक वाद-विवाद संभवतात. हेतुपुरस्सर दुर्लक्ष करा. एखाद्या समारंभाचे नियोजन कराल.
मकर - घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ - मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यवहारात लाभ संभवतो. शेतीविषयक कामे होतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीस्वास्थ्य जपा.
मीन - नोकरदारांना दिलासा मिळेल प्रवासाचे योग येतील पण प्रवासात सावधानता बाळगा मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील योग्य निर्णय घेऊन प्रसंगातून मार्ग काढा.