आजचे राशिभविष्य, ९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 9, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - दैनंदिन कामे सुरळीत होतील महत्त्वाच्या कामांबाबत दक्ष रहा. कामांमध्ये इतरांची मदत मिळू शकते प्रवासाचे योग. प्रवास कार्य सफल होतील.

वृषभ - विचारांमध्ये बदल घडतील. काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल. महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील.

मिथुन - मनोबल उत्तम राहून उत्साहात भर टाकणाऱ्या घटना आजूबाजूस घडतील नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.

कर्क - तुमच्या कार्यक्षेत्रात निरनिराळ्या मार्गांनी सुसंधी लाभू शकते. नवीन योजना सफल होईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात अथवा नोकरीत केल्यास फायदा होईल.

सिंह - जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडल्यामुळे आपली महत्त्वाची कामे करून घेऊ शकाल.

कन्या - प्रवासाचे योग आहेत मात्र वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो हे लक्षात ठेवा परंतु प्रवास सफल होतील.

तुळ - आपल्याजवळील मौल्यवान वस्तू, दाग दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या. वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा.

वृश्चिक - मालमत्तेची कामे मार्गी लागतील मध्यस्थी यशस्वी होऊन आर्थिक फायदा होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे मतभेद संपुष्टात येतील.

धनु - शत्रु व हितशत्रू यांच्या कारवायांकडे लक्ष ठेवणे आवश्यक राहील. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.

मकर - घरामध्ये एखादे हे मंगल कार्य घडेल. नातेवाईक आप्तेष्ट कुटुंबातील सदस्य यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. हातातील कार्य पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

कुंभ - नोकरीतील अथवा व्यवसायिक महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते त्या संधीचा पूर्णपणे फायदा घ्या.

मीन - रोजच्या जीवनात एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या पुढील कामांवर होतील. मनोबल वाढून उत्साहात भर पडेल.

logo
marathi.freepressjournal.in