महाराष्ट्र

अहमदनगरचं नाव अहिल्यानगर; मुख्यमंत्र्याची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या चौंडी येथे नामांतराची घोषणा केली आहे

नवशक्ती Web Desk

अहमदनगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तसेच राज्याच्या राजकारणात देखील अहमदनगरचं नाव आघाडीवर असते. राज्यात नुकतंच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या चौंडी येथे नामांतराची घोषणा केली आहे. त्यांच्या जन्मगावी त्यांच्या जयंतीनिमित्त या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.

अहिल्यादेवी नसत्या तर काशी दिसली नसती, त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, अहिल्यादेवी यांचं नाव हिमालया एवढं आहे. त्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी खूप काही केलं. अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा आमच्या काळात होणार असल्याने हे आमचं भाग्य असल्याचं ते म्हणाले. तसंच इथे येऊन ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचं काम आम्ही केल्याचंही ते यावेळी म्हणाले.

28 मे 1490 साली मलिक अहमद बादशहाने अहमदनगर शहराची स्थापना केली. या स्थापनेला नुकतीच 532 वर्ष पुर्ण झाली आहेत. या शहराचं नाव अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरुन करण्याची मागणी केली जात होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी