रामदास आठवले यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

मतदान सक्तीचे करणारा कायदा करावा; केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे मत

मतदानाची टक्केवारी खूप कमी होत आहे. अलिकडच्या निवडणुकांत शहरी भागात सुद्धा मतदान टक्केवारी कमी राहिली आहे. उलटपक्षी जम्मू-काश्मीर आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान सक्तीचे करणारा कायदा केला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : मतदानाची टक्केवारी खूप कमी होत आहे. अलिकडच्या निवडणुकांत शहरी भागात सुद्धा मतदान टक्केवारी कमी राहिली आहे. उलटपक्षी जम्मू-काश्मीर आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान सक्तीचे करणारा कायदा केला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी व्यक्त केले.

मतदान बुथ हा एक हजार मतदारसंख्येऐवजी पाचशे मतदार संख्या असणारा छोटा मतदान बुथ करावा. त्यामुळे मतदानासाठी मोठी रांग लागणार नाही. तसेच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मताधिकार जे वापरणार नाहीत, मतदान जे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणारा आणि सक्तीचे मतदान करणारा कायदा झाला तर मतदानाची टक्केवारी वाढू शकेल.

मतदान ऐच्छिक आहे. मात्र राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावे. मतदान करा लोकशाही मजबूत करा असे आवाहन रामदास आठवले यांनी बुधवारी वांद्रे पूर्व येथे मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर केले.

दुजाभाव झाल्याची तक्रार

वांद्रे पूर्व, गांधीनगरमधील नवजीवन विद्या मंदिर मतदान केंद्रात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आत सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत परवानगी दिलेले ओळखपत्र असणाऱ्या एका फोटोग्राफरला आत सोडावे अशी वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी एकाही फोटोग्राफरला आत सोडण्यास मनाई केली. त्याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून रामदास आठवले यांच्या कार्यालयाने वांद्रे मतदारसंघ नवजीवन मतदान केंद्रावरील तैनात पोलीसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती आठवले यांनी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी