PM
महाराष्ट्र

नांदेड : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई

सण-उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत.

Swapnil S

नांदेड : सण-उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत.

जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धी, व्हिडीओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईल, याबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे.

काही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणारे सामाजिक जाणीवांचे भान ठेवत नाही, अशांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर