दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक; मारेकऱ्याला शस्त्रे चालविण्याचे दिले प्रशिक्षण

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी गौरव विलास आपुणे या २३ वर्षांच्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातून अटक केली.

Swapnil S

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी गौरव विलास आपुणे या २३ वर्षांच्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातून अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरवने बाबा सिद्धीकी यांच्या शूटर्संना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते, या संपूर्ण कटाची त्याला माहिती होती असे तपासात उघडकीस आले आहे.

या गुन्ह्यांत अटक झालेला गौरव हा सोळावा आरोपी आहे. गेल्या महिन्यांत दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणार्‍या दोन शूटरसह पंधरा आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्‍वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड आणि सुजीत सुशील सिंग यांचा समावेश होता.

त्यांच्या चौकशीत गौरव याचे नाव समोर आले होते. गौरव हा पुण्याचा रहिवाशी असून त्याला या संपूर्ण कटाची माहिती होती. त्यामुळे त्याच्यावर तिन्ही शूटरला शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबईसह ठाणे, डोबिवली, नवी मुंबईसह पंजाब आणि इतर ठिकाणाहून पंधराहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या कारवाईनंतर गौरव हा पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याला पुण्यातून अटक केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी