मुंबई

बोरिवली येथे गोणीत सापडले मृतदेहाचे तुकडे

बोरिवली परिसरातील जंगलाच्या रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे करून ते प्लास्टिक पिशवीत व नंतर गोणीत भरून मृतदेह फेकून देत मारेकऱ्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

Swapnil S

मुंबई : बोरिवली परिसरातील जंगलाच्या रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे करून ते प्लास्टिक पिशवीत व नंतर गोणीत भरून मृतदेह फेकून देत मारेकऱ्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

बोरिवलीतील गोराई, बाबरपाडा, शेफाली गावाजवळील जंगलात काही स्थानिक रहिवाशांना सात गोण्या सापडल्या. या गोण्यांची तपासणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीची हत्या करून त्याच्या शरीराचे सात तुकडे करण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार समजताच गोराई पोलिसांनी गोणीतील अज्ञात व्यक्तीचे शिर, हात, पाय आणि धड असे सात तुकडे ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या गोणीतून कुजलेला वास येत होता, त्यामुळे स्थानिकांना संशय आला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी