मुंबई

लम्पी विषाणुचा फैलाव झपाट्याने वाढला; २,२०३ गायींना प्रतिबंधात्मक लस

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत.

प्रतिनिधी

राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पी विषाणुचा फैलाव झपाट्याने होत असून राज्यात आतापर्यंत २९ गायींचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ही लम्पी विषाणुचा शिरकाव झाला असून विषाणू पसरण्याआधी गायींचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईत ३ हजार २२६ गायी असून यापैकी २, २०३ गायींचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

२०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोवंशीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. २ हजार २०३ गायींचे लसीकरण झाले असून उर्वरित गोवंशीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, असे पठाण यांनी सांगितले.

मुंबईत तिसरी गाय पॉझिटिव्ह

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत तिसरी गाय लम्पी पॉझिटिव्ह आढळली आहे, तर या आधी आढळलेल्या लम्पी विषाणू बाधित दोन गायींवर गोरेगाव येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असलेल्या दोन्ही गायींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी