(संग्रहित छायाचित्र) ANI
मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसकालीन ब्लॉक नाही

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

सीएसएमटी स्थानकातून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान थांबतील. माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार असून या लोकल १५ मिनिटे उशिरा पोचतील. सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या/ सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

कुर्ला-पनवेल दरम्यान ब्लॉक

कुर्ला-पनवेल दरम्यान ब्लॉक कालावधीत २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री सांताक्रुझ ते माहीम स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी