नवी मुंबई

उरणमध्ये लाडक्या बहिणींची हेळसांड, बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिल्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये नुकतेच जमा झाले. हे पैसे आले की नाही, हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

उरण : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिल्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये नुकतेच जमा झाले. हे पैसे आले की नाही, हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण तालुक्यातील अनेक बँकामध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रथमतः बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी ओरड आता लाडक्या बहिणींकडून होत आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले.

आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी आपापल्या परिसरातील बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली आहे. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर बँकेतील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे देखील ताण पडत आहे.

गैरसोय दूर करण्याची मागणी

काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर तालुक्यातील अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी ऊन, पाऊस झेलत बँक परिसरात रांगा लावल्याचे दिसून येत आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बँकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बहिणींकडून केली जात आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी