PM
राजकीय

लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार; खासदार सुनील तटकरे यांना विश्वास

Maharashtra assembly elections 2024 : महाराष्ट्रात फिरत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट दिसून येत आहे. कारण आज राज्यातील लाखो बहिणींना १५०० रुपयांमुळे मोठा आधार प्राप्त झाला आहे.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : महाराष्ट्रात फिरत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट दिसून येत आहे. कारण आज राज्यातील लाखो बहिणींना १५०० रुपयांमुळे मोठा आधार प्राप्त झाला आहे. आगामी काळात महायुतीचे सरकार येणार असून तेव्हा लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय होणार आहे. आम्ही सुरू केलेली योजना कधीही बंद होणार नाही. या उलट योजना सुरू ठेवून सुद्धा विकासकामे आम्ही जलद गतीने पूर्ण केली आहेत. त्यामुळे राज्यातील जनता महायुतीला कौल देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे नरेटिव्ह पसरून आमच्या जागांवर परिणाम केला होता. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याचा कोणताही परिणाम होणार नाही. विशिष्ट समाजाची मते देखील महायुतीसोबत असून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता बहुमत प्राप्त करणार, असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी हे माझ्यापेक्षा जास्त लीड घेऊन विजयी होतील, असा विश्वास देखील तटकरेंनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा फसवा असून त्याला येथील मतदार फसणार नाहीत. महालक्ष्मी योजना हे दुटप्पीपणाचे लक्षण असून आम्ही योजना सुरू केल्यानंतर त्यांना शहाणपण येत आहे. एरव्ही हेच बोंबा मारणारे राज्यावर कर्जाचा बोजा होईल म्हणून ओरड करणारे आता निवडणूक जिंकण्यासाठी विविध घोषणा करीत आहेत.

मनोज जरांगेची चळवळ सखल मराठा समाजासाठी असून १० टक्के आरक्षणाचा लाभ समाजास देण्यात आला असल्याचे सांगत याचा लाभ समाजास मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अगदी सहज बहुमत मिळणार असून लोकाभिमुख राबवलेल्या योजना लोकांना भावल्या असून मतदाते विजयश्री महायुतीच्या पारड्यात टाकणार असल्याचा विश्वास यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

विकासाचा टप्पा गाठण्यासाठी केंद्राची मदत

महायुतीने विविध लोकाभिमुख योजना राबवत असताना विकासाचा रेपो नेहमी ऊंचीवर नेऊन ठेवला. केंद्र सरकारने महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवले, ही विरोधकांची बोंब खोटी असून महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उद्योग येत असून सुमारे दोन लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणारे कारखाने लवकरच कार्यान्वित होणार आहेत. केंद्राने नेहमीच महाराष्ट्राला झुकते माप दिले असून विकासाचा टप्पा गाठण्यासाठी मोठी मदत केली असल्याचा दावा देखील यावेळी तटकरे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी