विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया पुण्यात पोहचली. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. वर्ल्ड कपमध्ये भारताचा आगामी सामाना हा बांगलादेशच्या संघाविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात रंगणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाची विजयी वाटचाच पाहायला मिळाली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामन्याममध्ये विजय मिळवला आहे. भारताचा शेवटचा सामना पाकिस्ताविरुद्ध झाला. हा सामाना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. आता पुढचा सामाना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुपारी खेळवला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकातील मागचा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामान्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाची दाणादाण वडवली. आता पुढचा सामाना हा पुण्यात पार पडणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता नाणेफेक पार पडून २ वाजेला समान्याला सुरुवात होणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ४० एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. यात आतापर्यंत भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. टीम इंडियाने ३१ सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुले टीम इंडिया विरोधातील आगामी सामना चिंकणं बांगलादेशसाठी सोपं नसेल. या वर्षी या दोन्ही संघात केवळं एक सामना झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
बांग्लादेश क्रिकेट संघ
लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तनजीम हसन, शाकिब, शाकब नसूम अहमद, महेदी हसन.