ठाणे

पाचव्या मजल्यावरून श्वान अंगावर पडल्याने चिमुकलीचा अंत, मुंब्रामधील हृदयद्रावक घटना; CCTV फुटेज व्हायरल

Video: रस्त्यावरून पायी जात असताना पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरात घडली.

Swapnil S

ठाणे : रस्त्यावरून पायी जात असताना पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरात घडली. हा श्वान पडल्यानंतर या चिमुकलीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून संबंधित व्यक्तींकडे श्वान पाळण्याची परवानगी होती का ? याबाबत पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून अशा प्रकारे चिमुकलीचा अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुंब्र्यातील अमृत नगर परीसरातील रस्त्यावरून सना बानो ही चार वर्षांची चिमुकली मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आईसोबत पायी चालली होती. त्यावेळी चिराग मेन्शन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून सनाच्या अंगावर लॅब्रेडॉर प्रजातीचा पाळीव श्वान पडला. यामुळे तिच्या डोक्याला आणि शरीरातील अंतर्गत भागांमध्ये मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात आणि नंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषीत केले.

तिच्या आईने घडलेल्या प्रकरणाबाबत कुणावरही संशय अगर कुणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिला आहे. या घटनेत हा श्वानही जखमी झाला असून, प्राणी मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी