शीर व्हाईट लेस साडीत मराठमोळ्या अंकिताची कातिल अदा, चाहत्यांचे वेधले लक्ष

Swapnil S

मराठमोळ्या अंकिता लोखंडेने ‘Bigg Boss 17’ मध्ये प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तर तिची स्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय असते. नुकतेच तिचे आपल्या सोशल मीडियावर शीर व्हाईट लेस साडीमधील फोटो पोस्ट केले असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजात चर्र झाले आहे
अंकिताने शीर व्हाईट लेस साडी नेसली असून यामध्ये तिचा क्लासी लुक दिसून येत आहे. अंकिता नेहमीच साडीमध्ये अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसते. पार्टीसाठी हा साडी लुक परफेक्ट आहे.
अंकिताने या लेस साडीसह डीप नेक लाँग स्लीव्ह्ज ब्लाऊज घातला आहे. हा देखील लेसचा ब्लाऊज असून अंकिताच्या अदांनी वेड लावलं आहे.
अंकिताने या साडीसह थोड्या रेट्रो लुकची हेअरस्टाईल ठेवली असून हायलाईट केलेले केस हे एका बाजूला भांग पाडत स्टाईल केले आहेत आणि संपूर्ण वेव्ही लुक केलाय
अंकिताने घातलेल्या स्नेक नेकलेसनेदेखील यावेळी घातल्याचे दिसून आले. सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे हे डिझाईन असून सर्पंटी कलेक्शनमधील आहे.
या शीर लेस साडीसह तिने स्पेशल लुक करत विंग्ड आयलायनर लावले आहे, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याला रेट्रो लुक मिळाला आहे आणि तिच्या हास्याने चारचाँद लावले आहेत