बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज ५७ वा वाढदिवस!

Aprna Gotpagar

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित हिचा आज, १५ मे रोजी ५७ वा वाढदिवस आहे. | madhuri dixit instagram
बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला खरी ओळख ही 'तेजाब' या सिनेमातील 'एक-दो-तीन' या गाण्यातून मिळाली. | madhuri dixit instagram
९०च्या दशकात माधुरीने ‘दयावान’, ‘तेजाब’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ यासारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. | madhuri dixit instagram
माधुरी करिअर आघाडीवर असताना माधुरीने १९९९मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि अमेरिकेत स्थायिक झाली. | dr. shriram nene instagram
माधुरीच्या वाढदिवसानिमित्ताने पती श्रीराम नेने यांनी इन्सटाग्रामवर खास पोस्ट लिहली. | dr. shriram nene instagram
२०११मध्ये माधुरी कुटुंबासह भारतात आली. | madhuri dixit instagram