बॉलिवूडची 'डिंंपल गर्ल' चर्चेत, चाहत्यांसाठी शेअर केला खास लूक

Rutuja Karpe

प्रीती झिंटा हि तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्स आणि सौदर्यामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडच्या 'डिंंपल गर्ल'ने काही दिवसांपुर्वी आपला 49 वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला.
प्रीती झिंटाने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. प्रितीच्या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट करत आहेत.
या फोटोंमध्ये प्रीती फिकट गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत.
तिच्या या सिंपल लूकवर ती गोड स्माईल देताना दिसत आहे.
एका चाहत्याने तिच्या या फोटोंवर कमेंट करत, क्विन असं म्हंटलं आहे. तर अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक केलं आहे