आईची साडी आणि नथ घालून 'छाया कदम'ची कान्सला हजेरी!

Tejashree Gaikwad

अभिनेत्री छाया कदम मराठी चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. | @chhaya.kadam.75 / Instagram
संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्येही ती दिसली होती. आजकाल ती मंजू माईच्या रुपात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे | @chhaya.kadam.75 / Instagram
छायाने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली | @chhaya.kadam.75 / Instagram
या वेळी तिने कोणत्याही डिझायनरचा आऊटफिट घालण्यापेक्षा तिने तिच्या आईची साडी आणि नथ घालून सगळ्यांचं आश्यर्यचकित केलं | @chhaya.kadam.75 / Instagram
तिने कॅप्शनमध्ये लिहले की, आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले....पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू | @chhaya.kadam.75 / Instagram
५६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्येही ती दिसली आहे. आजकाल ती मंजू माईच्या रुपात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे | @chhaya.kadam.75 / Instagram