स्वतः बनलेला ड्रेस घालून कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली 'नॅन्सी त्यागी'
Tejashree Gaikwad
कान्स २०२४ च्या रेड कार्पेटवरून अनेक भारतीय सौंदर्यवतीचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर फॅशन सेन्सेशन नॅन्सी त्यागीचा 'कान्स' लूक चर्चेत आहे | @nancytyagi___/ Instagram
नॅन्सी त्यागी कोणत्याही फॅशन डिझायनरचा नाही तर स्वत:च बनवलेला ड्रेस परिधान करून कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली | @nancytyagi___/ Instagram
उत्तर प्रदेशच्या नॅन्सी त्यागीने गुलाबी रंगाच्या फ्रिल गाऊनमध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली | @nancytyagi___/ Instagram
नॅन्सीने स्वतः बनवलेल्या या गाऊनचे वजन २० किलो होते | @nancytyagi___/ Instagram
हा गाऊन बनवायला तिला ३० दिवस नि १,००० मीटर कापड लागले असे तिने सांगितले | @nancytyagi___/ Instagram
कोविडच्या काळात तिची आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. यानंतर तिने घरखर्च भागवण्यासाठी शिवणकाम सुरू केले | @nancytyagi___/ Instagram
तिने बनवलेल्या कपड्यांचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते. तिच्यासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत पोहोचणे हे एका मोठ्या यशापेक्षा कमी नाही | @nancytyagi___/ Instagram