PHOTO: काळ्या गाऊनमध्ये सोनम कपूरचा सुंदर लूक

Rutuja Karpe

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर अनेकदा तिच्या स्टायलिश लूक मूळे चर्चेत येत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काळ्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते सोनमच्या लूकची प्रशंसा करताना दिसताय.
फोटोंमध्ये सोनम कपूर काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला आहे. तिने बन हेअर स्टाइल केलेली असून कानात मोठे झुमके घातले आहेत. न्यूड मेकअपमुळे सोनमचा लूक क्लासिक दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, लिक्विड ब्लॅक! ऑड्रे हेपबर्नने म्हटल्याप्रमाणे, 'एलेगन्स हे एकमेव सौंदर्य आहे जे कधीही कमी होत नाही'.
सोनमने ही फोटो शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि अनेकदा ती फॅशनेबल लुक आणि वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवरही खूप व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यावर खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.