PHOTO: ओव्हरसाईज ब्लेझरमधील तृप्ती डिमरीने शेअर केले बोल्ड फोटो

Rutuja Karpe

'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शित झाला आणि अभिनेत्री तृप्ती दिमरी चर्चेत आली. या चित्रपटात तृप्तीला खूप पसंती मिळाली आहे. तृप्ती दिमरीचे लाखो चाहते आहेत.
दरम्यान, तृप्तीने नुकतेच केलेले फोटोशुट व्हायरल झाले आहे तिच्या लुकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतील उतरला आहे.
या फोटोंमध्ये तृप्तीने बादामी रंगाचा ओव्हरसाईज ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे, ज्यासोबत तिने पांढऱ्या रंगाची पारदर्शक पँट घातली आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या सुर्यप्रकाशामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
यावेळी तुप्तीने खूप कमी मेअकप ठेवला होता. या सुंदर लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.