रेड ऑफशोल्डर गाऊन; अभिनेत्री जान्हवी कपुरच्या लूकने चाहते घायाळ, शेअर केले फोटो

Rutuja Karpe

बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून, जान्हवी कपूर तिचा फॅशनमूळे नेहमीच चर्चेत येत असते.
पुरस्कार समारंभ असोत, रेड कार्पेट इव्हेंट्स, चित्रपटाच्या जाहिराती किंवा कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी, जान्हवी तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत येते.
जान्हवी फॅशनच्या टिप्स ही शेअर करत असते.
दरम्यान, रेड ऑफशोल्डर लेस कॉर्सेट गाऊनमधील फोटो शेअर करत अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हे. जान्हवीच्या परफेक्ट फिगर फिट गाऊनमध्ये जान्हवी अतिशय हॉट दिसत आहे, तर तिच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलेय.
तिने या ड्रेसला शोभेल असाचा ग्लॅमरस मेकअप केलाय, तर आयलायनर आणि लिपस्टीकमुळे तिचा चेहरा अजुनच उठावरदार दिसून येत आहे.
जान्हवीने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडले असून तिचे हायलाईट करण्यात आलेले केस वेव्ही हेअरस्टाईलमुळे अधिकच आकर्षक दिसत आहेत.