रोजच्या जेवनात 'हे' ७ सॅलड खा...आणि राहा निरोगी

Krantee V. Kale

ग्रीक सॅलड : टोमॅटो, काकडी, कांदा, ऑलिव्ह, चीज आणि ऑलिव्ह ऑइलसह बनवलेले हे सॅलड अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्सने भरलेले असते. | फोटो सौ : Free Pik
फळांचे सॅलड : सफरचंद, संत्री, डाळिंब, द्राक्षे,किवी यांसारखी फळे एकत्र करून बनवलेले सॅलड शरीराला ऊर्जा देते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. | फोटो सौ : Free Pik
स्प्राउट्स सॅलड : हरभरे, मूग यांसारख्या मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेले हे सॅलड प्रोटीन आणि फायबर्ससाठी उत्कृष्ट आहे. | फोटो सौ : Free Pik
पालक व कॉर्न सॅलड : हिरव्या पालकासोबत उकडलेले कॉर्न, थोडासा लिंबू व मसाले यामुळे हे सॅलड लोह आणि फायबर्सचा उत्तम स्रोत आहे. | फोटो सौ : Free Pik
क्विनोआ सॅलड : क्विनोआ, भाज्या आणि लिंबू रस वापरून तयार केलेले हे सॅलड प्रोटीन आणि अँटी-इंफ्लेमेटरी असते. | फोटो सौ : Free Pik
कॅरट-बिट सॅलड : गाजर आणि बीटरूट यांचे सॅलड रक्तशुद्धीसाठी फायदेशीर असून त्यात अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. | फोटो सौ : Free Pik
कॅबेज-स्लॉ सॅलड : कोबी, गाजर, आणि थोडेसे दही वापरून तयार केलेले हे सॅलड पचन सुधारते आणि कमी कॅलोरी असते, तसेच वजन कमी करणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे. | फोटो सौ : Free Pik