कान्सला ऐश्वर्या राय-बच्चनची हजेरी, हातातल्या प्लास्टरसोबतच दिल्या पोझ

Tejashree Gaikwad

ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये सहभागी झाली. यावेळी तिच्या हाताला प्लास्टर असूनही अभिनेत्रीने दुखापत बाजूला ठेवून कान्सच्या रेड कार्पेटवर अतिशय स्टायलिश अंदाजात दिसली. | @Femina/Instagram
ऐश्वर्या रायच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तरीही तेवढ्याच स्टाईलमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसली. अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉरिअल पॅरिसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून भाग घेतला आहे. | @Femina/Instagram
या वर्षी तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला होता. या आउटफिटमधल्या पांढऱ्या पफ्ड स्लीव्हजमुळे लूक एकदम वेगळा दिसत होता. | @femina/ Instagram
या लूकसाठी अभिनेत्रीने हलका मेक-अप केला आहे आणि सोन्याचे कानातले घातले होते. केसांची ओपन हेअरस्टाईल केली होती. | @Femina/Instagram
वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच कान्सच्या राणीसारखी दिसत आहे. | @Femina/Instagram
या खास इव्हेंटला ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन ही देखील दिसली. | @Femina/Instagram