दुधाशिवाय 'या' गोष्टींमध्येही असते भरपूर प्रमाणात कॅल्शियम

Tejashree Gaikwad

दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत आहे. पण दुधाशिवायही असे काही पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर असते. | Pixabay
सोयाबीन: दुधाप्रमाणेच सोयाबीनमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. तुम्ही आहारात सोयाबीन, सोया चंक्स, सोया मिल्क आणि टोफू यासारख्या सोयाबीनपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचा समावेश करू शकता. | Pixabay
अंडी: अंडी हा फाक्त प्रथिनांचाच नाही तर कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. | Freepik
पालक: पालेभाज्यांमध्ये पालकामध्ये सर्वाधिक कॅल्शियम असते. पालक भाजी किंवा त्याचे सूप बनवून खाऊ शकता. | Pixabay
बदाम: प्रोटीनसोबतच बदमात उच्च कॅल्शियमही असते. | Freepik
सुके अंजीर: सुके किंवा वाळलेले अंजीर हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. यामध्येही मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. | Freepik
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) | Freepik