जास्त मीठ खाणं टाळा, शरीरावर होतात गंभीर दुष्परिणाम
Rutuja Karpe
जेवणात मीठ नसेल तर कितीही चांगलं असणारं जेवण बेचव लागतं. पण मीठ योग्य प्रमाणात असेल तर त्याच जेवणाला चव येते
जास्त मीठ खाण्याचे शरिरावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. जास्त मीठ खाणं धोक्याचं असतं.
हृदयरोग, रक्तदाव वाढीच्या समस्या उद्भवतात. याशिवाय लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते. मीठ- सोडियमचं अति सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतं.
2 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना कमी मीठ दिलं गेलं पाहिजे. गर्भवती महिलांना 1,500 मिलिग्रॅम म्हणजे चार ग्रॅमच्या आसपास मीठ खावू शकतात.
घरी जेवण बनवतानाही मीठाचं प्रमाण कमी करायला हवं. कमीत कमी मीठाचं सेवन करण्यावर भर द्या. चिप्स किंवा चमचमीत पदार्थ खाण्याऐवजी फळं, सुकामेवा असे पदार्थ खा