रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्या आरोग्यवर्धक गुळाचा चहा

Rutuja Karpe

सकाळी सकाळी एक कप गरम चहा प्यायल्याने दिवसाची जबरदस्त सुरूवात होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा असल्यास तर अजुनच जास्त मज्जा. तर सकाळचा एक कप चहा प्यायल्याने उबदारपणा ताजेपणा आणि ऊर्जाही मिळते
साखरेच्या चहापेक्षाही पोषक तत्वांनी समृद्ध असतो तो म्हणजे गूळाचा चहा. हा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात
गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, जी कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. रोगप्रतिकारक शक्ती शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते.
गूळ हे एक नैसर्गिक अन्न आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. रोज गुळाचे सेवन केल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करते, ज्यामुळे ॲनिमियापासून आराम मिळतो.