भिजलेल्या मेथी दाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या सविस्तर

Swapnil S

बऱ्याच काळापासून वजन कमी करायचे असेल तर मेथीचे पाणी यासाठी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यात अधिक प्रमाणात फायबर असते, जे पोट भरलेले ठेवते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि उगीचच पदार्थ खाल्ले जात नाहीत. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसंच मेथी दाण्यातील आढळणारे गुण पोटावरील चरबी जाळण्यास मदत करतात. | PM
भिजवलेल्या मेथी दाण्याचे पाणी पिण्यामुळे पचनाशी निगडीत समस्या दूर होतात. हे पाणी पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमधील फायबर हे मलत्याग करण्यास उपयुक्त ठरते. शौचाला कडक होत असण्याची समस्या असेल तर यामुळे त्यातून सुटका मिळते. तसंच मेथीच्या पाण्यात पाचक एंजाईम असून जेवण सोप्या पद्धतीने पचवते. | PM
भिजवलेल्या मेथी पाण्याच्या सेवनाने मधुमेह अर्थात डायबिटीस नियंत्रणात येण्यास मदत मिळते. मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. हे पाणी नियमित पिण्याने डायबिटीस नियंत्रणात राहतो आणि शरीरही हेल्दी राहाते. हे पाणी डायबिटीसमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवून देते. | PM
हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठीही भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. मेथीचे पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्टसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसंच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते. | PM
भिजवलेल्या मेथी पाण्यामुळे त्वचेला फायदा मिळतो. हे पाणी त्वचेची अलर्जी कमी करण्यास मदत करते. तसंच मेथीच्या पाण्याच्या सेवनाने त्वचेला पोषण मिळते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग निघून जाण्यास मदत मिळते. हे पाणी त्वचा मुलायम करण्यासह चमकदार होण्यासही मदत मिळते. | PM