करण-अर्जुन फेम आणि बॉलिवूडच्या 90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीने महाकुंभमेळ्यात घेतला संन्यास; फोटो व्हिडिओ व्हायरल

Kkhushi Niramish

90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. | all pics mamta kulkarni official insta
ममता ही 90 च्या दशकातील एक बोल्ड अभिनेत्री होती.
ममता कुलकर्णीने ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘नसीब’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘आंदोलन’, ‘छुपा रुस्तम’, ‘घातक’, ‘वक्त हमारा है’, ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सिनेविश्व सोडल्यानंतर ती विदेशात स्थायिक झाली होती. त्यानंतर ती तिच्या पार्टनर विकी गोस्वामीसह ड्रग्ज केसमुळे चर्चेत आली होती
FPJ च्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने ममताला ड्रग्ज केसमध्ये क्लिन चीट दिली होती
25 वर्षानंतर भारतात पुन्हा आल्यानंतर तिने 'आमची मुंबई' म्हणत एक भावनिक पोस्ट टाकली होती
त्यानंतर प्रयागराज येथे सन्यास घेतल्यामुळे ती पुन्हा जोरदार चर्चेत आली असून सोशल मीडियावर तिचे संन्यास विधीचे फोटो-व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
शुक्रवारी महाकुंभमधील किन्नर आखाड्यात तिने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
संन्यास घेतल्यानंतर ती आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. तिच्यावर अभिषेक होत असताना ती फार भावूक होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते
ममताचे वय आता 52 वर्षे असून तिने स्वतःचे पिंड दान केले आहे. आता ती यमाई ममता नंद गिरि या नावाने ओळखली जाईल
ममताने भगवे वस्त्र परिधान करून रुद्राक्ष माळा घातल्या होत्या
सन्यास का घेतला याचे कारण सांगतानाचा तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे | all pics mamta kulkarni official insta