सतत थकवा, हाडं दुखणे...'ड' जीवनसत्वाची कमतरता? जाणून घ्या 'हे' ५ नैसर्गिक उपाय

Krantee V. Kale

१. सूर्यप्रकाश : सूर्यप्रकाशाच्या संपर्काने तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या ड जीवनसत्व तयार होते. मात्र, खूप जास्त प्रमाणात सूर्याचा प्रकाश त्वचेवर घेतल्यास तो घातक ठरु शकतोे. | फोटो सौ : FPJ
२. तृणधान्ये : जर तुम्हाला नाश्त्याला तृणधान्ये (cereals) खायला आवडत असतील, तर ही चांगली सवय आहे. अनेक तृणधान्यामूळे ड जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. | फोटो सौ : FPJ
३. दूध : गाईचं दूध हे नैसर्गिकरित्या ड जीवनसत्व वाढवण्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थांपैकी एक आहे. त्यासाठी रोजच्या आहारात दूध समाविष्ट करा. | फोटो सौ : FPJ
४. अंडी : ड जीवनसत्व वाढवण्यासाठी अंडी खाणे योग्य मानले जाते. विशेषतः अंड्याच्या पिवळ्या भागात ड जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे अंडी खाताना पिवळा भाग काढू नका. मात्र, अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रमाणातच सेवन करा. | फोटो सौ : FPJ
५. मासे : मासे हे मांसाहारी व्यक्तींना लागू आहेत. मासे हे ड जीवनसत्वाचा सर्वांत उत्तम स्रोत मानले जातात. विशेषतः सॅल्मन व ट्यूना या प्रकारात सर्वाधिक प्रमाणात ड जीवनसत्व आढळते. | फोटो सौ : FPJ
'ड' जीवनसत्व हे एक अत्यावश्यक जीवनसत्व आहे, जे शरीरामध्ये हाडांची योग्य वाढ व देखभाल यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय, ते मेंदू, स्नायू व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. | फोटो सौ : FPJ