लवंग चघळण्याचे शरीराला काय फायदे होतात?

Tejashree Gaikwad

भारतीय स्वयंपाक घरात अनेक मसाले वापरले जातात. त्यातीलच एक म्हणजे लवंग. | Freepik
दररोज २ लवंगा चघळण्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. चला २ लवंगा चघळण्याने फायदे जाणून घेऊयात. | Freepik
लवंग औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात. | Freepik
रोज दोन लवंगा चघळण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या मसाल्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती मजबूत करते. | Pixabay
लवंगात युजेनॉल असते जे दातदुखी कमी करण्यास मदत करते. सायनसच्या वेदना कमी करण्यासाठी देखील लवंगा खूप उपयुक्त आहेत. | Pixabay
सकाळी रिकाम्या पोटी दोन लवंगा चोखल्याने पचनक्रिया चांगली राहते. पचनाच्या समस्या दूर होतात. | Freepik
श्वास आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही लवंग गुणकारी आहे. | Freepik