'ही' फळं रात्री खाऊ नये

Tejashree Gaikwad

काही लोक रात्रीच्या जेवणानंतर फळं खातात. परंतु, रात्री काही फळं खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. | Freepik
वर्षभर उपलब्ध असलेली केळी रात्री खाऊ नये. कारण केळी रात्री खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. केळी पचायलाही जड असल्याने सकाळी त्रास होऊ शकतो. | Freepik
चिकूमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रात्री खाणे टाळावे. चिकू रात्री खाल्ल्यास तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. | Pixabay
उन्हाळ्यात भरपूर कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यामध्ये पाण्यासोबतच साखरेचे प्रमाणही भरपूर असते. याच कारणाने रात्री हे फळ खाऊ नये. | Freepik
सफरचंद हे फळ आरोग्यासाठी सर्वतोत्तम आहे. पण, रात्रीच्या वेळी सफरचंद खाऊ नये. कारण यामुळे ॲसिडिटीसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. | Freepik
संत्रीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. हे फळ चवीला आंबट असते. रात्री आंबट खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. | Freepik