अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Tejashree Gaikwad

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.
अक्षय्य तृतीया निमित्त मंदार देसाई (देसाई बंधू आंबेवाले) यांच्यातर्फे ११,००० हजार आंब्यांचा नैवेद्य दगडूशेठ बाप्पाला केला आहे.
मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मंदिराचे ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा आंबा महोत्सव आयोजिण्यात आला आहे.
मंदिरावर झेंडूच्या फुलांनी आंब्याची प्रतिकृती देखील साकरण्यात आली आहे.
अक्षय तृतीये नंतर उद्या आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.