केस लांब वाढताच टोकांना फाटे फुटतात? 'या' ३ चुका टाळा, केस होतील मऊ अन् सिल्की!
Mayuri Gawade
लांबसडक, घनदाट आणि चमकदार केस प्रत्येकालाच हवे असतात. मात्र, केसांच्या टोकांना फाटे फुटल्यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि विस्कटलेले दिसू लागतात. या समस्येला स्प्लिट एंड्स म्हणतात.
केसांना वारंवार स्ट्रेटनर, कर्लर किंवा हेअर ड्रायरने हीट दिल्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होऊन टोकांना फाटे फुटू शकतात.
केसांना वारंवार रंग लावणं, केमिकल ट्रीटमेंट करणं किंवा वेगवेगळी हेअर प्रोडक्ट्स वापरणं यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. परिणामी केस कमकुवत होऊन त्यांना फाटे फुटण्याची शक्यता वाढते.
ओले केस जोरात विंचरणं, टॉवेलने घासून पुसणं किंवा केस घट्ट बांधून ठेवणं यामुळे केस तुटू शकतात. त्यामुळे केस हाताळताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
एकदा केसांना फाटे फुटले की ते तेल किंवा सीरम लावून पुन्हा जोडता येत नाहीत. अशा वेळी केसांची खराब झालेली टोकं थोडी कापून घेणं हा योग्य पर्याय आहे.
केस धुताना सौम्य शॅम्पू वापरा आणि प्रत्येक वेळी कंडिशनर लावा. कंडिशनरमुळे केस मऊ होतात आणि विंचरताना होणारं घर्षण कमी होण्यास मदत मिळते.
केस धुतल्यानंतर टॉवेलने जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पाणी टिपून घ्या. ओले केस नाजूक असल्यामुळे रुंद दातांच्या कंगव्याने हळूहळू विंचरा.
स्ट्रेटनर आणि कर्लरचा वारंवार वापर टाळा. हेअर ड्रायर वापरताना कमी तापमान निवडा आणि केसांना हीटपासून संरक्षण देणारं प्रोटेक्टंट उत्पादन वापरा.
केस निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडेही लक्ष द्या. डाळी, कडधान्यं, दूध, दही, सुका मेवा, फळं आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. केसांच्या वाढीसाठी शरीराला पुरेसं प्रथिन आणि पोषक घटक मिळणं महत्त्वाचं आहे.
| All Photos : AI Generated