हेल्दी आणि रिफ्रेशिंग! पचनासाठीही फायदेशीर; मसाला ताकाचे 'हे' प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात थंडगार उपाय! मसाला ताक बनवण्याच्या ५ भन्नाट पद्धती, जाणून घ्या | (सर्व छायाचित्रे: Yandex & AI)
पुदिना ताक (Mint Pudina Chaas) - पुदिन्याच्या पानांमुळे ताकाला एक वेगळा फ्लेवर मिळतो. तसेच पुदिन्याच्या पानांमुळे पचन सुधारण्यास मदत होते. हे पोट फुगणे कमी करण्यास उपयोगी ठरते.
अद्रक मसाला ताक (Ginger Masala Chaas) - आल्यामुळे ताकाला हलकी तिखट चव येते. हे पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते.
कोथिंबीर मसाला ताक (Coriander Green Chaas) - कोथिंबिरीमुळे ताकाला हर्बल फ्लेवर मिळतो. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असून शरीराच्या आरोग्यास फायदेशीर आहे.
हिंग तडका ताक (Hing Tadka Chaas) - हिंगाची फोडणी दिल्यामुळे ताकाची चव अधिक रुचकर होते. हिंग पचनासाठी उपयुक्त असून गॅसची समस्या कमी करते.
कढीपत्ता मसाला ताक (Curry Patta Masala Chaas) - कढीपत्त्यामुळे ताकाला खास सुगंध आणि चव येते. हे आयर्नयुक्त असून मेटाबॉलिझम आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
आरोग्यदायी आणि ताजेतवाने राहण्यासाठी या ५ पद्धती नक्की ट्राय करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)