घाईत काय बनवायचं? १० मिनिटांत तयार होतील 'या' सोप्या आणि चविष्ट भाज्या

किशोरी घायवट-उबाळे

जिरा आलू : उकडलेल्या बटाट्यांना जिरे आणि मसाल्यांची फोडणी देऊन ही भाजी तयार होते. चविष्ट आणि झटपट बनणारी ही भाजी रोटी किंवा पराठ्यासोबत उत्तम लागते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
पनीर भुर्जी : पनीर, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांपासून तयार होणारा प्रोटीनयुक्त पदार्थ. फक्त काही मिनिटांत तयार होऊन जेवणाची चव वाढवतो.
भेंडी मसाला : आधीच चिरलेली भेंडी वापरल्यास ही भाजी १० मिनिटांत तयार होते. हलकी, पौष्टिक आणि दैनंदिन जेवणासाठी उत्तम पर्याय आहे.
शेव टोमॅटोची भाजी : टोमॅटोच्या आंबट-गोड रस्स्यात कुरकुरीत शेव घालून ही भाजी बनवली जाते. गुजराती शैलीतील ही भाजी वेगळ्या चवीचा अनुभव देते.
मटर पनीर : उकडलेले मटार आणि ताजे पनीर वापरून ही लोकप्रिय भाजी पटकन बनते. मसालेदार ग्रेव्हीमुळे घरातील प्रत्येकाची आवडती ठरते.