दररोज कोरफड ज्यूस पिण्याचे ७ फायदे

Suraj Sakunde

कोरफड ज्यूसमध्ये विपुल प्रमाणात पोषण तत्त्वे आढळतात. त्यामुळं कोरफड ज्यूस शरीरासाठी लाभदायी असतो.

दररोज कोरफड ज्यूस प्यायल्यानं शरीराला काय फायदे होतात, हे आज जाणून घेऊया.

आरोग्यतज्ञांच्या मते, कोरफड ज्यूसमध्ये आढळणाऱ्या एंटीऑक्सिडंटमुळं त्वचा निरोगी राहण्यासाठी लाभदायी मानले जातं. दररोज कोरफड ज्यूसचं सेवन करण्यामुळं चेहरा तेजस्वी होतो.

कोरफड रसाच्या विटामिन-सी मोठ्या प्रमाणात आढळतं, त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आरोग्यतज्ञांच्या मते, कोरफड ज्यूस दररोज प्यायल्यानं वजन कमी करण्यास मदत होते.

काही अभ्यासांनुसार कोरफड ज्यूसचं सेवन केल्यामुळं पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

ओरल हेल्थ राखण्यामध्ये कोरफड ज्यूस फायदेशीर ठरतो.

दातांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यासाठी तुमच्या आहारामध्ये कोरफड ज्यूसचा समावेश करू शकता.

कोरफड ज्यूसच्या सेवनामुळं केसांना पोषण मिळतं आणि ते सिल्की व मजबूत होतात.