सकाळी लवकर का उठावं? 'हे' आहेत ७ फायदे
Suraj Sakunde
सकाळी लवकर उठणं, ही चांगली सवय मानली जाते. असं करणं आरोग्यासाठीही लाभदायी असते.
आज आपण दररोज लवकर उठल्यानं काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.
दररोज लवकर उठून मॉर्निग वॉकला गेल्यास शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सचं सीक्रेशन वाढतं. त्यामुळं तणाव आणि डिप्रेशनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जर तुम्ही दररोज लवकर उठलात, तर तुम्ही वर्कआऊटसाठी वेळ काढू शकाल आणि तुमचा नाश्ताही वेळेत होईल. त्यामुळं शरीराला मजबूती मिळेल.
सकाळी लवकर उठल्यानं रात्री योग्य वेळी झोपही येते. त्यामुळं अनिद्रेच्या समस्येपासून सुटका मिळते.
सकाळी लवकर उठून योगा, मॉर्निंग वॉक किंवा व्यायाम केल्यानं वजन नियंत्रित राहतं.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जास्त काळ झोपल्यामुळं हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळं दररोज लवकर उठल्यानं हृदय हेल्दी राहतं.
दररोज सकाळी ताजी हवा घेतल्यानं त्वचेच्या पेशी हेल्दी राहतात, त्यामुळं चेहऱ्यावर तेज येतं.
सकाळी लवकर उठून नियमित एक दिनचर्या फॉलो केल्यानं आळस येत नाही. कामात मन लागून राहतं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते.