धबधबे, धुकं आणि हिरवाई! पुण्याजवळचे 'हे' ७ ट्रेक पावसाळ्यात नक्की एक्सप्लोर करा
किशोरी घायवट-उबाळे
भिवपुरी धबधबा, कर्जत : नवशिक्यांसाठी सोपा ट्रेक असून हिरवाईत कोसळणारा धबधबा खास आकर्षण ठरतो.
भीमाशंकर ट्रेक : दाट जंगल, धबधबे आणि निसर्गरम्य दऱ्यांचा रोमांचक अनुभव देणारा ट्रेक आहे.
रोहिडा (विचित्रगड) किल्ला : शांत वातावरण, प्राचीन अवशेष आणि पावसाळ्यातील अप्रतिम निसर्ग येथे पाहायला मिळते.
ड्यूक्स नोज (नागफणी), लोणावळा : धुक्यात हरवलेले कडे आणि मनमोहक व्हॅली व्ह्यूचा थरार येथे पाहायला मिळतो.
कातळधार धबधबा, लोणावळा : ३५० फूट उंच धबधबा पाहण्यासाठी रोमांचक ट्रेकचा अविस्मरणीय अनुभव येथे घेऊ शकता.
विसापूर किल्ला : किल्ल्याच्या पायऱ्यांवरून वाहणारा धबधबा हा ट्रेकचा मुख्य आकर्षण ठरतो.
पुरंदर किल्ला : इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम असून पावसाळ्यात हिरवाईने नटलेला किल्ला आहे.