वजन कमी करण्यासाठी ७ दिवस फॉलो करा 'हा' डाएट प्लॅन

Suraj Sakunde

अलीकडच्या काळात अनेक लोक लठ्ठपणानं त्रस्त आहेत. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहारही महत्त्वाचा आहे.

बँगलोरमधील जिंदल नेचरक्योर इंन्स्टिट्यूच्या चीफ डायटिशियन सुषमा पीएस यांनी वेगानं वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन सुचवला आहे.

पहिला दिवस- नाश्त्यामध्ये तुम्ही ओटमील, तर लंचमध्ये १०० ग्रॅम कोणत्याही भाजीसोबत १०० मिली डाळ, ३० ग्रॅम ब्राऊन राईल, १०० ग्रॅम सालाद घ्या. संध्याकाळच्या वेळी ग्रीन टी १ कप आणि १ मुठभर भिजवलेले बदाम खायला हवेत. डिनरमध्ये तुम्हाला ग्रिल्ड पनीर, २०० ग्रॅम उकडलेली भाजी आणि ३० ग्रॅम क्विनोआचे सेवन करा.

दुसरा दिवस- १०० ग्रॅम इडलीसोबत १०० ग्रॅम सांबर, २० ग्रॅम टोमॅटोची चटणी आणि एक ग्लास ताक नाश्त्यामध्ये घेऊ शकता. दुपारी १०० ग्रॅम मिक्स भाजी, १०० ग्रॅम हिरवं सलाद आणि गव्हाची २ रोटी घ्या. डिनरमध्ये ५० ग्रॅम पनीर टीक्का, ३० ग्रॅम ब्राऊन राईस आणि १०० ग्रॅम उकडलेली भाजी

तिसरा दिवस- नाश्तामध्ये एक प्लेट पोहे, १ ग्लास फळांचा रस घ्या. लंचमध्ये १ वाटी चन्याची भाजी, २ गव्हाची रोट्या आणि सालाद तर सायंकाळी एक कप ग्रीन टीसोबत २० ग्रॅम भिजवलेले आक्रोड, तसेच रात्री १०० ग्रॅम ग्रिल्ड पनीरसोबत १०० ग्रॅम शिजलेल्या भाज्या, सोबत १०० ग्रॅम क्विनोआ

चौथा दिवस: नाश्तामध्ये दूध, लंचमध्ये १ वाटी मसूर डाळ, २ चपात्या, सायंकाळी १ कप दहीमध्ये थोडं अलसी पावडर आणि रात्री ५० ग्रॅम ग्रिल्ड पनीरसोबत २०० ग्रॅम उकडलेली भाजी, ३० ग्रॅम बाऊन राईस

पाचवा दिवस-१०० ग्रॅम ओट्सचा नाश्ता, लंचमध्ये १०० ग्रॅम पालक आणि सोयाबीनची भाजी, २ चपाती, १०० ग्रॅम सलाद, तर संध्याकाळी एक कप ग्रीन टीसोबत एक मुठ भिजवलेले बदाम, डिनरमध्ये १०० ग्रॅम हलकी तळलेली भाजी, १ छोटा बाऊल क्लिनोआ.

सहावा दिवस-नाश्त्यामध्ये ताक, लंचमध्ये १०० ग्रॅम मिक्स भाजी, २ चपात्या आणि सलाद, सायंकाळी १ कप दह्यात थोडी अलसी पावडर टाकून पिऊ शकता. डिनरमध्ये ७५ ग्रॅम ग्रिल्ड पनीरसोबत १०० ग्रॅम उकडलेल्या भाज्या, ३० ग्रॅम ब्राऊन राईस

सातवा दिवस- नाश्त्यामध्ये १ प्लेन डोसा, चटणईसोबत खावा. १ ग्लास ताज्या फळांचा ज्यूस प्यावा. दुपारी जेवनात एक वाटी डाळ तडका, २ चपात्या, १०० ग्रॅम सलाद तर सायंकाळी एक कप ग्रीन टीसोबत २० ग्रॅम भिजवलेले अक्रोड आणि रात्री १०० ग्रॅम हलकी तळलेली भाजी, १ छोटी वाटी क्विनोआ