Kitchen Tips : दररोजच्या स्वयंपाकासाठी उपयुक्त स्मार्ट ट्रिक्स; काम होईल सोपं

किशोरी घायवट-उबाळे

मसाले मंद आचेवर शिजवा - मसाले नेहमी कमी आचेवर परतल्यास त्यांचा रंग टिकतो आणि चव अधिक खुलते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
टोमॅटो नसल्यास केचप वापरा- एखाद्यावेळी घरात टोमॅटो नसतील तर केचप सॉस वापरूनही ग्रेव्हीला रंग आणि चव देता येते.
खीर जड भांड्यात बनवा - जाड तळाच्या भांड्यात खीर बनवल्यास दूध तळाला लागत नाही आणि खीर छान घट्ट होते.
फ्रिजमधील दुर्गंधी घालवण्यासाठी फ्रिजमध्ये लिंबाची फोड ठेवल्यास फ्रेशनेस टिकून राहतो.
कपवरील डाग काढण्यासाठी सोडा वापरा - चहा/कॉफीचे हट्टी डाग काढण्यासाठी कपात सोडा टाकून काही वेळ ठेवल्यास कप सहज स्वच्छ होतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)