पार्टनरला लग्न करायचंय की नाही हे सांगणारे ७ संकेत, तुम्ही कधी केलेत का नोटीस?

Tejashree Gaikwad

जेव्हा दोन लोक एका रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी समजतात. स्वभाव, सवयी सगळेच माहिती होते. | Pixabay
एकत्र राहत असताना, रिलेशनशिपमध्ये असताना अनेक वेळा आपल्या पार्टनरला आपल्याची लग्न करायचे आहे की नाही हे लक्षात येऊ लागते. | Pixabay
आज आम्ही तुम्हाला अशाच ७ संकेतांबद्दल सांगत आहोत जे दर्शवतात की तुमचा पार्टनर तुमच्याशी लग्न करू इच्छित आहे की नाही. | Pixabay
रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा पार्टनर तुमच्याशी लग्न करू इच्छित असेल तर तो तुमच्याशी भविष्याबद्दल नक्कीच बोलेल. | Freepik
जर तुमचा जोडीदार तुमच्याशी आयुष्याशी छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करत असेल त्याबद्दल सल्ला घेत असाल तर यावरून असे दिसून येते की त्यालाही तुमच्याशी लग्न करायचे आहे. | Pixabay
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नात्यात पुढे जायचं असेल तेव्हा तो आपल्या जोडीदाराची त्याच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबाशी ओळख करून देतो. हाही एक संकेत आहे. | Pixabay
पैसे आणि बँक बॅलन्सची चर्चा करणे हे सूचित करते की तुमचा पार्टनर तुमच्यासोबत भविष्याचा प्लॅन करत आहे. | Pixabay
तुमचा जोडीदार तुमच्याशी लग्नाबद्दल बोलत असेल तर तो तुमच्या नात्याबद्दल खूप सिरीयस आहे हे समजते. हा सुद्धा एक संकेत आहे. | Pixabay
तुम्हाला कोणत्या प्रकारची अंगठी हवी आहे किंवा तुम्हाला एक अंगठी भेट म्हणून दिली आहे, तर या सर्व गोष्टी सूचित करतात की तुमचा पार्टनर तुमच्याशी लग्न करण्यास गंभीर आहे. | Pixabay
जर तुमचा जोडीदार त्याच्या घराशी संबंधित विषयांवर तुमचे मत घेऊ लागला तर याचा अर्थ असा होतो की त्याने तुम्हाला त्याच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारले आहे. | Pixabay