Republic Day 2026 : ७७ वा की ७८ वा? यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या

Mayuri Gawade

दरवर्षी अनेकांना यंदा कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे, याबाबत संभ्रम असतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
हा संभ्रम दूर करणे आवश्यक आहे कारण योग्य माहिती ऐतिहासिक दृष्टिकोनातून तसेच दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
भारताचा प्रजासत्ताक दिवस दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
भारत २६ जानेवारी १९५० रोजी पूर्णतः प्रजासत्ताक देश झाला आणि भारतीय संविधान लागू झाले.
या दिवशी नागरिकांना नवीन कायदेशीर अधिकार आणि घटनात्मक हक्क प्राप्त झाले.
प्रजासत्ताक दिवसाला देशभर भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारतीय लोकशाहीसाठी हा दिवस अत्यंत ऐतिहासिक मानला जातो कारण संविधानाच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करण्यात आली.
भारताचा पहिला प्रजासत्ताक दिवस २६ जानेवारी १९५० रोजी साजरा झाला.
२६ जानेवारी २०२५ रोजी ७६वा प्रजासत्ताक दिवस साजरा झाला होता.
त्यामुळे २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे.