रोज सकाळी भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट्स; आरोग्य राहील उत्तम
किशोरी घायवट-उबाळे
बदाम (Almonds) - रात्री ५-६ बदाम भिजवून सकाळी सोलून खाल्ल्यास मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
अक्रोड (Walnuts) - ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध अक्रोड हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
मनुका (Raisins) - भिजवलेल्या मनुकांमुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते.
अंजीर (Figs) - भिजवलेले अंजीर फायबरने भरपूर असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
काळे मनुके (Black Raisins) - लोह आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असलेले काळे मनुके रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात.
खजूर (Dates) - भिजवलेले खजूर शरीराला झटपट ऊर्जा देतात आणि अनेक जीवनसत्त्वे व खनिजे पुरवतात.
चिया बिया (Chia Seeds) - रात्रभर भिजवलेल्या चिया बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ मुबलक असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.
सुके जर्दाळू (Dried Apricots) - भिजवून खाल्लेले सुके जर्दाळू व्हिटॅमिन A, फायबर आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहेत.
टीप : ड्रायफ्रूट्स प्रमाणात खावेत. मधुमेह, किडनीचे आजार किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.