डीप बॅकलेस नको? मग हे ८ ब्लाऊज डिझाइन्स देतील तुम्हाला एलिगंट आणि ट्रेंडी लुक

Mayuri Gawade

बॅकलेस ब्लाऊज प्रत्येकालाच आवडतील असं नाही. अनेक महिलांना साडीमध्ये स्टायलिश दिसायचं असतं, पण त्याचवेळी कम्फर्ट आणि एलिगन्सही महत्त्वाची वाटते.
जर तुम्हालाही फार डीप बॅक किंवा बॅकलेस डिझाइन नको असेल, तर हे ट्रेंडी आणि सुंदर ब्लाऊज बॅक नेक डिझाइन्स नक्कीच आवडतील.
व्ही-कट बॅक डिझाइन - साध्या ब्लाऊजला हटके लुक देणारे हे व्ही-कट डिझाइन एलिगंट आणि क्लासी दिसते. ऑफिस पार्टीपासून कौटुंबिक कार्यक्रमांपर्यंत कोणत्याही प्रसंगासाठी हा पर्याय परफेक्ट आहे.
मोत्यांच्या डिटेलिंगसह यू-कट बॅक - मोठ्या बॅकलेस कटऐवजी सुंदर यू-शेप नेक आणि मोत्यांची सजावट ब्लाऊजला रॉयल टच देते. पारंपरिक साड्यांसोबत हे डिझाइन विशेष खुलून दिसते.
क्लासिक राऊंड कट बॅक - जास्त त्वचा न दाखवता स्टायलिश दिसायचं असेल तर हे राऊंड कट डिझाइन उत्तम पर्याय आहे. सिल्क आणि कॉटन साड्यांसोबत याचा लुक आकर्षक दिसतो.
असिमेट्रिकल बॅक नेक - नेहमीच्या डिझाइन्सपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर असिमेट्रिकल कट ट्राय करा. हा मॉडर्न लुक पारंपरिक साडीलाही फॅशनचा ट्विस्ट देतो.
फॅब्रिक नॉट डिटेलिंग डिझाइन - लहान कटआउट आणि फॅब्रिक डिटेलिंगमुळे हा ब्लाऊज आकर्षक दिसतो. जास्त बॅकलेस न ठेवताही स्टायलिश लुक मिळवण्यासाठी हा पर्याय योग्य ठरतो.
बो-स्टाइल बॅक नेक - ब्लाऊजच्या मागील बाजूस दिलेला मोठा बो डिझाइन संपूर्ण लुकच उठावदार बनवतो. तरुणींमध्ये सध्या हा ट्रेंड विशेष लोकप्रिय आहे.
स्कॅलप कट आणि डोरी डिटेलिंग - स्कॅलप फिनिश आणि डोरी वर्कमुळे ब्लाऊजला पारंपरिक आणि मॉडर्न असा दोन्ही लुक मिळतो. लग्नसमारंभांसाठी हा डिझाइन उत्तम पर्याय आहे.
कटआउट बॅक विथ ट्रेडिशनल बॉर्डर - पारंपरिक काठ आणि छोट्या कटआउटचा मिलाफ असलेले हे डिझाइन एलिगंट दिसते. जास्त बोल्ड न वाटता आकर्षक लुक मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. | all photos : pintrest