सावधान! फ्रिजमध्ये नका ठेवू हे ९ पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम
Swapnil S
फ्रिजचा वापर आता आपल्या जीवनात सामान्य झाला आहे. आपण अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो, परंतु काही अन्नपदार्थ असे आहेत, जे आपण फ्रिजमध्ये ठेऊ नये. चला, जाणून घेऊया हे ९ अन्नपदार्थ कोणते? | फोटो सौ : FreePik
वॉटर मेलन... म्हणजेचं 'टरबूज', पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळ म्हणून टरबूजला ओळखले जाते. या फळाला फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. हे फळ फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यामुळे सर्दी होऊ शकते, कारण हे फळ आधीच थंड असते.
| फोटो सौ : FreePik
कांदा....कांदे नेहमी कोरड्या ठिकाणी ठेवायला हवे. फ्रिजमध्ये कांदा ठेवल्यास ओलाव्यामुळे त्याला अंकुर फुटू शकतात, जे खाण्यास योग्य नाही. जर काही कारणामुळे तुम्ही कांदे फ्रिजमध्ये ठेवत असाल, तर त्यांना फॉयल पेपरमध्ये गुंडाळून ठेवणे योग्य ठरेल.
| फोटो सौ : Meta AI
'मध'...मध फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचे टेक्स्चर बदलते. कमी तापमानात मध गोठू शकतो. मध नेहमी सामान्य तापमानात ठेवले पाहिजे, ज्यामुळे ते लिक्विड स्वरुपात राहते. मध फ्रिजमध्ये ठेवून खाल्यास त्याची चव देखील खराब होते.
| फोटो सौ : FPJ
एवोकाडो...एवोकाडो हे फळही फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये. थंडीमुळे या फळातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात. | फोटो सौ : FPJ
बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. थंड तापमानात त्यामधील स्टार्च शुगरमध्ये बदलते, ज्यामुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते तसेच चव देखील बदलते आणि पचनाला अडचण होऊ शकते.
| फोटो सौ : FPJ
ड्रायफ्रुट्स अर्थात सुका मेवा कधीही फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये. फ्रिजमधील तापमानामुळे त्यांची चव आणि शरीराला मिळणारे पोषक घटक व फायदे दोन्ही बदलतात. ड्रायफ्रुट्स नेहमी किचनमधील एखाद्या बंद कंटेनरमध्ये सामान्य तापमानात ठेवले पाहिजे.
| फोटो सौ : FPJ
डार्क चॉकलेट, बहुतेक लोक चॉकलेट फ्रिजमध्येच ठेवतात. परंतु फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याच्या चवीत बदल होतो आणि रंगही वेगळा होतो. त्यामुळे डार्क चॉकलेट बाहेरच ठेवले पाहिजे.
| फोटो सौ : FPJ
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव बदलून फिकट होऊ शकते व त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्सही कमी होतात. त्यामुळे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही.
ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची ही चूक प्रत्येक व्यक्तीकडून होते. काहीजण ब्रेडला अनेक दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवून खातात. पण ते योग्य नाही. ब्रेड नेहमी ताजा असतानाच खाणे योग्य आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)