Suraj Sakunde
सौदी अरेबियाच्या मक्का येथे हज यात्रेला गेलेल्या एक हजार यात्रेकरूंचा उष्णतेच्या लाटेनं मृत्यू झाला.
याशिवाय हजारो यात्रेकरू अत्यवस्थ आहेत. मृतांमध्ये ७० भारतीयांचाही समावेश आहे.
सौदी अरेबियातील तापमान ५२ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे.
प्रचंड उकाड्यामुळं हज यात्रेकरूंना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.
मृतांमध्ये ६५८ भाविक इजिप्तचे असून १४०० जण बेपत्ता आहेत.
१२ ते १९ जूनदरम्यान ७० भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा भारतातून १ लाख ७५ हजार भाविक हज यात्रेला गेले आहेत.
केरळचे हज मंत्री अब्दुल रेहमान यांनी केंद्र सरकारकडे भारतीयांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
सौदी अरेबियात उष्णतेची लाट कायम असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
हज यात्रेला गेलेल्या भाविकांच्या मृत्यूमुळं जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.