अभिज्ञा भावेचा साडीतील एलिगंट लूक; ज्वेलरीने वेधलं लक्ष, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिचे साडीतील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोत तिचा एलिगंट आणि रॉयल लूक पाहायला मिळत आहे. | (सर्व छायाचित्रे: Instagram/ @abhidnya.u.b)
ड्रेपिंग स्टाइलची खासियत-अभिज्ञाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये साडी नेसण्याची वेगळी आणि ट्रेंडी स्टाइल दिसून येतेय.
केसांसाठी बन स्टाईल तसेच खऱ्या फुलांनी अभिज्ञाच्या हेअरस्टाइल लुकमध्ये भर पाडली आहे.
ज्वेलरीचा परफेक्ट टच- प्रत्येक साडीवर शोभेल अशी साजेशी मिनिमल आणि क्लासी ज्वेलरी अभिज्ञाच्या फोटोमध्ये पाहायला मिळतेय.
कॉन्फिडंट अटिट्यूड - Queen in her draping era अशी कॅप्शन तिने शेअर केलेल्या फोटोजना दिली आहे. यातून तिचा आत्मविश्वास झळकतो.
सॉफ्ट मेकअपमुळे अभिज्ञाचा प्रत्येक लूक नॅचरल दिसून येतोय. नेकलेस, झुमके, बांगड्या, घड्याळ आणि छोटीशी टिकली यामुळे तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
अभिज्ञाच्या फोटोजवर अनेक अभिनेत्रींनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर तिने प्रेक्षकांना "तुम्हाला माझा कोणता लूक जास्त आवडला?" असा प्रश्नही विचारला आहे.
अभिज्ञाच्या पोस्टवर चाहत्यांच्याही कमेंट येत असून तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.