नवा लूक, नवी स्टाईल! ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या लेटेस्ट फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

Mayuri Gawade

इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यावेळी कारण ठरला आहे त्याचा स्टायलिश आणि एकदम फ्रेश नवा लूक, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिजीतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा स्मार्ट आणि हँडसम अंदाज पाहायला मिळतो.
यानंतर काही वेळातच अभिजीतच्या या नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले
नव्या हेअरस्टाईल आणि ग्रूमिंगमुळे त्याचा लूक अधिक स्मार्ट आणि आकर्षक दिसत आहे.
गायक म्हणून नेहमीच वेगळे प्रयोग करणाऱ्या अभिजीतच्या या बदलामागे काही खास कारण आहे का, याची चर्चा रंगली आहे.
नवं गाणं, चित्रपट की एखादा ओटीटी प्रोजेक्ट? चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलसोबतच्या गाण्यामुळे चर्चेत आलेला अभिजीत आता पुन्हा नव्या अंदाजात समोर आला आहे.
या नव्या लूकमागचं रहस्य काय आहे, याचा खुलासा अभिजीत लवकरच करणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. | All Photos : Instagram