तुनिषा शर्माप्रमाणे 'या' कलाकारांनी संपवली होती आपली जीवनयात्रा

प्रतिनिधी

हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'ची अभिनेत्री वैशाली ठक्करने १६ ऑक्टोबर २०२२ला गळफास घेत केली आत्महत्या.

'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने २४व्या वर्षी १ एप्रिल २०१६मध्ये केली होती आत्महत्या

'क्राईम पेट्रोल' मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने काम मिळत नसल्याने २६ मी २०२०मध्ये संपवली आपली जीवनयात्रा

'गजनी', 'हाऊसफुल्ल', 'निशब्द' अशा सुप्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी केली होती आत्महत्या

बॉलिवूडमध्ये टॉपवर असलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून २०२० रोजी नैराश्यात असल्याने केली होती आत्महत्या

सिनेमे हिट जात नसल्याने आणि काम मिळत नसल्याने अभिनेता कुशल पंजाबीने २६ डिसेंबर २०१९मध्ये केली होती आत्महत्या

'धोनी द अनटोल्ड स्टोरी' आणि 'केसरी' सारख्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या संदीप नहार १६ फेब्रुवारी २०२१ला केली होती आत्महत्या

नैराश्य आणि आर्थिक संकटामुळे १५ मे २०२० रोजी अभिनेता मनमीत ग्रेवालने संपवली आपली जीवनयात्रा

बॉलिवूडमध्ये यश मिळत नसल्याने सुप्रसिद्ध अभिनेता इंदर कुमारने २८ जुलै २०१७ला आत्महत्या केली होती